मंडळी, पार्टिकल एक्सलरेटर या एका प्रचंड मोठ्या मशीन मधून कण (particles) प्रकाशाच्या वेगाने फिरवले जातात. या पद्धतीने मूलकण भौतिकशास्त्राचा (particle physics) अभ्यास केला जातो. या मशीनमुळे आजतागायत अनेक शोध लागलेले आहेत. आपला आजचा किस्सा याच मशीनच्या संदर्भात आहे.
‘अॅनाटोली बुगोरस्की’ हे रशियन शास्त्रज्ञ रशियन पार्टिकल एक्सलरेटरवर काम करत होते. या पार्टिकल एक्सलरेटरचं नाव होतं Synchrotron U-70. जुलै १३, १९७८ रोजी अॅनाटोली यांना Synchrotron च्या आत बिघाड आहे असा संशय आला आणि त्यांनी तपासण्यासाठी आपलं डोकं मशिनच्या आत घातलं. Synchrotron मशीन त्यावेळी बंद होती. ज्या भागात त्यांनी डोकं घातलं होतं तिथूनच इलेक्ट्रॉन्सची गती वाढवली जायची. अॅनाटोली यांनी तपासासाठी आत डोकं टाकल्यानंतर त्याचवेळी सुरक्षाव्यवस्था बंद पडली आणि मशीन चालू झाली.
धमाका !!!