आपल्या शरीरात अनेक घडामोडी किंवा हालचाली घडत असतात. त्यात बऱ्याचश्या मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात तर काही अचानक घडतात ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. त्या क्रिया अगदी निरुपयोगी वाटतात. जसं कधीकधी बोलताना अचानक तोंडातून लाळ फवारली जाते. जांभई देताना तर बऱ्याचदा असा अनुभव येतो. कंटाळा आला की आपण जांभई देतो किंवा झोपेतून उठल्यावर जांभई देतो पण अचानक कधी लाळ बाहेर उडते आणि समोर कोणी असेल तर फार विचित्र वाटतं. असं का घडतं?
जेव्हा अशी लाळ फवारली जाते त्या क्रियेला ग्लिकिंग (Gleeking) म्हणतात. ग्लिकिंग म्हणजे साप जसा त्याच्या तोंडातून विष फवारल्यावर ते विष लांबपर्यंत उडतं तसंच आपल्या तोंडातूनही लाळ उडते. आपण काही आंबट पाहिल्यावर किंवा खाल्यावरही लाळ उडते. आपण म्हणतो ना तोंडाला पाणी सुटले तेव्हा मोठ्या प्रमाणात लाळ आपल्या जिभेखाली स्त्रवली जाते आणि तिथे साठते.






