अवकाश हे अतिशय गहिरे आहे. फार जुन्या काळापासूनच लोकांना आकाशाची पर्यायाने अवकाशाबद्दल उत्सुकता होती. हळूहळू नासा या संस्थेतील एका अॅलन शेपर्ड नावाच्या वैज्ञानिकाच्या डोक्यात एक कल्पना आली की अवकाशात सजीव जाऊ शकतात का आणि गेले तर तिथे काही काम करू शकतात का?
अवकाशात संशोधन करण्यासाठी नासाचे हे पहिले पाऊल मानावे लागेल. अवकाशात पहिला माणूस पाठविण्याआधी अवकाशात एक प्रयोग म्हणून एका चिंपांझीला पाठवायचे ठरवले गेले. चिंपांझी हुशार असतात तसेच चिंपांझी बुद्धीचा वापर करून काही कामे करू शकतात. याच वैशिष्ट्यामुळे चिंपांझीची निवड करण्यात आली. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर स्वतः अॅलन शेपर्ड अवकाशात प्रवास करणार होता. सुदैवाने चिंपंझीचा प्रयोग यशस्वी झाला आणि नंतर अॅलन शेपर्ड स्वतः मिशन मर्क्युरी या उपक्रमाअंतर्गत अवकाशात जाऊन आला.









