माणसाचा इतिहास युद्धाच्या रक्तपाताने रंगलेला आहे. आधी फक्त स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणारा मानव जेव्हा समूहाच्या माध्यमातून दुसऱ्या मानव समूहाशी लढायला लागला, तेव्हा युध्दाचा जन्म झाला. युद्ध म्हणजे विध्वंस, रोगराई, दारिद्र्य, वाताहात याच्या वर्णनांनी इतिहासाची पाने भरून गेली आहेत. मात्र युध्दांनी मानवजातीला एक देणगी दिली आहे. ती म्हणजे प्रत्येक युद्धात वैद्यकीय शास्त्र विकसित होत गेले.
आज आम्ही तुम्हाला जगातल्या पहिल्या प्लास्टिक सर्जरीबद्दल अशी माहिती देणार आहोत जी झाली युरोपात, पण त्याचे मूळ होते प्राचीन भारतीय वैद्यक शास्त्रात !









