बाळाला जन्मापूर्वीच चक्क आईच्या गर्भातून काढून पुन्हा गर्भात ठेवण्यात आलं...काय आहे हा प्रकार ??

बाळाला जन्मापूर्वीच चक्क आईच्या गर्भातून काढून पुन्हा गर्भात ठेवण्यात आलं...काय आहे हा प्रकार ??

बाळ जन्माला येण्यागोदर त्याला आईच्या गर्भातून काढून पुन्हा गर्भात ठेवल्याचं कधी ऐकलंय का ? नुकतंच हा एक ऐतिहासिक प्रकार घडला आहे. डॉक्टरांनी हा प्रकार का केला. काय कारण होतं की नवजात बालकाला गर्भातून बाहेर काढण्याची वेळ आली ? चला समजून घेऊ...

स्रोत

मंडळी, युकेची बेथन सिम्पसन या महिलेच्या पोटातून साडेचार महिन्याचं बाळ शस्त्रक्रियेने बाहेर काढण्यात आलं होतं. या बाळावर एक खास पद्धतीची शस्त्रक्रिया केल्यानंतर बाळाला पुन्हा गर्भात ठेवण्यात आलं.

अत्यंत कठोर अशा निकषांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेच्या अगोदर बेथनला चाचण्या आणि स्कॅन्स मधून जावं लागलं. या सगळ्यातून गेल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी मंजुरी मिळाली. युके मध्ये या प्रकारच्या शस्त्रक्रियेची ही चौथी वेळ आहे.

स्रोत

ही शस्त्रक्रिया आई आणि बाळासाठी धोकादायक होती. पण सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

या प्रकारची शस्त्रक्रिया का करण्यात आली ?

अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेला त्याच प्रकारचं मोठं कारणही लागतं. या केस मध्ये बेथनच्या बाळाच्या शरीरात ‘स्पिना बिफिडा’ नावाचा दोष होता. पाठीच्या कण्याची पूर्ण वाढ न झाल्याने हा दोष उद्भवतो. खालील फोटो मध्ये याचं उदाहरण तुम्ही पाहू शकता.

स्रोत

मंडळी, युके मध्ये SHINE नावाची संस्था या आजाराविषयी जनजागृती करण्याचं काम करत आहे. शस्त्रक्रियेनंतर बेथनने या संस्थेसाठी देणगी मिळवण्याचा विडा उचललाय.   

 

आणखी वाचा :

आईच्या मृत्यूनंतर १२३ दिवसांनी झाला जुळ्यांना जन्म.. कसा? मग हे वाचाच..

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख