माणसाचं शरीर म्हणजे एक गुढ आहे. अनेक चमत्कारिक गोष्टी यामध्ये घडत असतात. विज्ञानाच्या मार्गाने शरीराचा अभ्यास करण्यात माणसाला बऱ्यापैकी यश आले आहे, पण असं काहीतरी नवीन घडतं की परत विचार सुरू होतो, हे खरंच शक्य आहे का? हो! बघा ना सध्या एका चुंबकीय माणसाचे फोटो व्हायरल होत आहेत. असा हा पहिलाच माणूस नव्हे, यापूर्वीही जगभरात अशी अनेक चुंबकीय माणसे समोर आली आहेत. या सगळ्यांचा एकच दावा होता की ‘आमच्या शरीरात चुंबकीय शक्ती आहे’. पण खरोखरच चुंबकीय लोकं आहेत का? या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या? आज समजून घेऊयात या मागचे वैज्ञानिक कारण.
सुरुवातीला चुंबकीय शक्ती बाळगणाऱ्या लोकांनी केलेले दावे पाहूया.








