१८ जून १९८३! झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डचे चेअरमन डेव्ह एलमन ब्राऊनना एक फोनकॉल आला. तो कॉल बीबीसीच्या रिपोर्टरचा होता. त्यांना ब्राऊनचा इंटरव्यू घ्यायचा होता. कारण त्यांना वाटत होते कि झिम्बाब्वे भारताविरुद्ध सुरु असलेला सामना जिंकत आहे. तसे वाटणे पण साहजिक होते, कारण भारताच्या १७ रन्स वर ५ विकेट पडल्या होत्या. मॅच आयोजित करणारे आणि बीबीसीवालेसुद्धा हे बघून टेंशनमध्ये आले होते. त्यांना असे वाटत होते ही मॅच अर्ध्या तासात आटपेल. पण ब्राऊन यांनी दोघांना उत्तर दिले
'द गेम इज नॉट ओव्हर'
आणि मंडळी, ब्राऊनचे शब्द खरे ठरले. जेवढया लवकर आपले नेते पलटत नाहीत त्याहून लवकर मॅच पलटली.












