या टॅक्सीवर दाखवला जातो लाईव्ह IPL स्कोर....ICC ने पण केलंय कौतुक !!

या टॅक्सीवर दाखवला जातो लाईव्ह IPL स्कोर....ICC ने पण केलंय कौतुक !!

क्रिकेटच्या चाहत्यांच आवडतं वाक्य – “स्कोर काय झाला रे ??”. जे स्टेडीयमवर प्रत्यक्ष उपस्थित राहून शकत नाहीत ते टीव्ही समोर बसतात आणि ज्यांना कामामुळे तेही शक्य नसतं ते एक तर मोबाईल मध्ये स्कोर बघतात किंवा मग इतरांना स्कोर काय झाला म्हणून विचारत बसतात. वर्ल्डकप आणि IPLच्या मौसमात तर रेडीओला पण भाव येतो.

तुम्ही जर हैदराबाद मध्ये असाल तर हे सगळं करण्याची गरज नाही पडणार भाऊ, कारण हैद्राबाद मध्ये एक टॅक्सी आहे जी तुम्हाला लाईव्ह स्कोर सांगते.

कोण आहे भला माणूस ?

दुर्दैवाने या भल्या माणसाचं नाव समजलेलं नाही. त्याने केलेलं पुण्य मात्र हैद्राबाद मध्ये फिरत आहे राव. त्याने क्रिकेट प्रेमींसाठी आपल्या टॅक्सीवर चक्क लाईव्ह स्कोरबोर्ड लावला आहे. u/FresnoMac या रेडीट युझरने या टॅक्सीचा पत्ता लावलाय. रेडीटवर त्याने टॅक्सीचा फोटो शेअर केला होता.

तुम्ही फोटो नीट बघितला तर शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्याचे स्कोर तुम्हाला दिसतील.

हा फोटो इतका व्हायरल झालाय की ICC ने पण याची दाखल घेतली आहे. हा पाहा ICC चा ट्विट !!

मंडळी, जगभरचे क्रिकेट प्रेमी या टॅक्सीचं भरभरून कौतुक करत आहेत. लोकांनी तर आपण स्कोर बघण्यासाठी कसा जुगाड केला याचे किस्से पण सांगितले आहेत. चला तर लोकांच्या प्रतिक्रिया पण बघून घेऊ.

 

 

 

 

राव या झाल्या ट्विटरवरच्या प्रतिक्रिया, आता बोभाटाच्या वाचकांच्या प्रतिक्रिया येउद्या.. कमेंट बॉक्स आपलाच आहे !!

टॅग्स:

IPLcricket

संबंधित लेख