उद्यापासून टोक्यो ऑलिम्पिकची रणधुमाळी सुरू होत आहे. भारताचे खेळाडू यंदा जास्तीतजास्त पदके मिळवण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहेत. १९२० पासून भारताने जवळपास प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे सामने केव्हा असतील जाणून घेऊया.
या सर्व वेळा भारतीय स्टँडर्ड टाइमनुसार दिल्या आहेत.
तिरंदाजी
23 जुलै
5.30 am - दीपिका कुमारी, महिला एकेरी पात्रता फेरी
9.30 am - प्रवीण जाधव, अतनु दास, तरुणदीप राय, पुरुष एकेरी पात्रता फेरी
जुलै 24
6.00 am - मिक्स टीम इलिमेनेशन्स (अतनु दास, दीपिका कुमारी)
जुलै 26
6.00 am - मेन्स टीम इलिमेनेशन्स (प्रवीण जाधव, अतनु दास, तरुणदीप राय)
जुलै 27 ते 31
6.00 am - पुरुष आणि महिला एकेरी इलिमेनेशन्स
1.00 pm - मेडल सामने










