सर्वांचे लक्ष लागून असलेल्या ड्रीम 11 आयपीएल २०२० च्या वेळापत्रकाची शेवटी घोषणा झाली आहे. कोरोनामुळे यंदा युनायटेड अरब अमिरातीमध्ये प्रेक्षकांशिवाय होणारी ही पहिलीच स्पर्धा!! २०१४ नंतर दुसऱ्यांदा यूएईत या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी अबूधाबी येथे मुंबई आणि चेन्नईमधील धमाकेदार सामन्याने स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजेला स्पर्धेला सुरुवात होईल.
दुसरी आणि तिसरी मॅच दुबई येथे होईल, तर चौथी मॅच शारजहा येथे होणार आहे. दुबईत २४, अबुधाबीला २० तर शारजहाला १२ मॅचेस होणार आहेत. याआधी मुंबईचा खेळाडू लसीथ मलिंगा आणि चेन्नईचा खेळाडू सुरेश रैना यांनी माघार घेतली होती, तर काल हरभजनने देखील २ काय, २० कोटी दिले तरी खेळणार नाही म्हटले आहे. तर एकूण अशा वातावरणात यंदाच्या स्पर्धा भरविण्यात येणार आहे.









