आयपीएलचा रणसंग्राम आता काहीच दिवसांवर आला आहे. आयपीएल सुरू होण्याआधीच गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आलेला सॉफ्ट सिग्नलचा नियम हटविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. याच बरोबर थर्ड अंपायरला आता मैदानावरील अंपायरने दिलेला नो बॉल आणि शॉर्टरनचा निर्णय देखील बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय? सॉफ्ट सिग्नलचा नियम बदलल्याने आयपीएलमध्ये काय फरक पडणार आहे?


नुकतीच पार पडलेली इंग्लंडविरुद्धची सिरीज सॉफ्ट सिग्नलमुळे वादग्रस्त ठरली होती. यावेळी अनेक निकाल हे भारताविरुद्ध देण्यात आले होते. देशात या निर्णयांविरुद्ध संताप देखील उसळला होता. 18 मार्च रोजी झालेल्या मॅचमध्ये भारताच्या सुर्यकुमारने मुसळधार बॅटिंग केली होती. अवघ्या 31 बॉल्समध्ये त्याने 57 रन्स चोपले होते. आपल्या करियरमधील पहिलीच मॅच खेळत असणाऱ्या सुर्यकुमारला इंग्लंडच्या सॅम कॅरनने आउट केले. कॅच पकडणाऱ्या डेव्हिड मलानच्या हातातला चेंडू जमिनीला टेकलेला रिव्ह्यूमध्ये स्पष्ट दिसत होते. पण सॉफ्ट सिग्नलमुळे सुर्यकुमारला परत यावे लागले होते.
या घटनेनंतर देशातून सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द करण्यात येऊन पूर्वीप्रमाणेच पद्धत असावी अशी मागणी होत होती. बीसीसीआयने ती मागणी मान्य केली आहे. यापुढे थर्ड अंपायरकडे निर्णय जाण्यापूर्वी मैदानावरील अंपायरकडे कुठलाही अधिकार नसेल.

काय आहे सॉफ्ट सिग्नल?
जेव्हा एखादा क्लोज पॅच किंवा विकेटची परिस्थिती स्पष्ट नसते, तेव्हा मैदानावरील अंपायर हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवत असतात. पण थर्ड अंपायरकडे निर्णय सोपविण्यापूर्वी मैदानावरील अंपायर आपल्या सहकारी अंपायरसोबत चर्चा करून निर्णय घेतो, याला सॉफ्ट सिग्नल असे म्हटले जात असते.
तर, या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मते कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या !
टॅग्स:
संबंधित लेख

आयपीएल स्पर्धेतून अचानक गायब झालेले खेळाडू! एकाने तर केकेआरला बनवले होते चॅम्पियन...
२८ डिसेंबर, २०२२

आयपीएल लिलावात या ५ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; मोडू शकतात कमाईचे आजवरचे विक्रम...
२२ डिसेंबर, २०२२

आयपीएल स्पर्धेत या फलंदाजांनी पाडला आहे षटकारांचा पाऊस; यादीत केवळ २ भारतीय...
२० डिसेंबर, २०२२

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या लिलावात हे ५ खेळाडू होऊ शकतात मालामाल! लागू शकते कोट्यावधींची बोली...
८ डिसेंबर, २०२२