मनात हुरहूर.... डोक्यात तर्कवितर्क, आणि ते सक्तीने आपल्याला ऐकायला लावणारे क्रिकेटचे पीएचडी धारक मित्र... काल IPL च्या दहाव्या सीझनसाठी खेळांडूची बोली लागली तेव्हा तुमचीही हीच परिस्थिती होती का? थोडा अपेक्षित, तर थोडा अनपेक्षित निकाल या लिलावाने समोर आणलाय खरा. पण इथे बघा.. काही नव्या खेळाडूंना या लिलावात चांगलीच लॉटरी लागलीय.














