ऑलिम्पिक स्पर्धेत यावेळी भारतीय खेळाडूंच्या पदकांच्या संख्येत वाढ व्हावी याकडे डोळे लावून बसलेल्या भारतीयांना स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी चांगली बातमी मिळाली. मीराबाई चानू यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाले आहे.
अवघी ४ फूट ११ इंच उंची असलेल्या मीराबाई यांची मागच्या ऑलिम्पिकमधील अतिशय वाईट कामगिरी पाहता यावेळी त्या पदक मिळवतील का याकडे संशयाने बघितले जात होते, पण सर्वांचे अंदाज खोटे ठरवत मीराबाई यांनी 'हार कर जितने वाले को बाजीगर कहते है', ही गोष्ट सिद्ध केली.
भारताला २००० साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवून दिले होते. पण गेली २० वर्ष या खेळात पदकाचा दुष्काळ होता, मीराबाई यांनी तो दूर केला आहे.







