क्रिकेट म्हटले म्हणजे वयाच्या ३० नंतर शरीर हवे तेवढे सक्षम राहत नाही. म्हणून या वयात आल्यावर खेळाडूंवर निवृत्त होण्यासाठी दबाब असतो. ४० वय झालेला खेळाडू सहसा निवृत्त झालेला असतो. पण याला मात्र एक मराठी खेळाडू अपवाद होता. प्रवीण तांबे या खेळाडूची स्टोरी रोचक आहे.
२ बॉलवर ३ विकेट घेणारा बहाद्दर....निवृत्त होण्याच्या वयात त्याने मैदान गाजवले होते!!


ज्या वयात लोक क्रिकेट सोडून दुसऱ्या कामधंद्याला लागतात, त्या वयात त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. तब्बल वयाच्या ४२ व्या वर्षी तो २०१३ साली आयपीएलसाठी मैदानावर उतरला. तोवर तो मुंबईत क्लब मॅचेस खेळत होता. या वयात देखील त्याने करिष्मा दाखवायला सुरुवात केली.
२०१४ साली त्याने कोलकाता विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आणि भावाने जोरदार हवा केली. हॅट्ट्रिक पण अशी तशी नाही २ बॉलवर तीन विकेट त्याने घेतल्या होत्या. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? तर त्याने पहिला बॉल वाइड फेकला आणि विकेटकिपरने मनीष पांडेला मागून आऊट केले.

पुढील दोन बॉलवर त्याने सलग युसूफ पठाण आणि रेयॉन दोशा यांच्या विकेट्स घेतल्या. पहिला वाइड बॉल मोजला गेला नाही म्हणून २ बॉलवर ३ विकेट हा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. पूर्ण सिजन त्याने चांगलाच गाजवला. त्याने नंतर गुजरात लायन्स, हैदराबाद, असा प्रवास केला.
गेल्या वर्षी त्याला वयाच्या ४८ व्या वर्षी कोलकाताने विकत घेतले. सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून त्याची ओळख झाली. पण एका विचित्र कारणाने त्याच्या बंदी घालण्यात आली. बीसीसीआयचा एक नियम आहे, निवृत्त झालेला खेळाडू कुठल्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. त्याने आपली निवृत्ती मागे घेतली होती. पण निवृत्ती मागे घेतली आहे हे त्याने बीसीसीआयला मात्र कळवले नाही. यामुळे त्याला बंदीचा सामना करावा लागला.

काहीही असले तरी भावाचा खेळ मात्र जबरदस्त होता. त्याने गेल्या वर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही गोष्टींमध्ये चांगली कामगिरी करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१