सचिन तेंडुलकरला एकदा विचारण्यात आले होते, त्याचे विक्रम मोडण्याची क्षमता असलेला भारतीय खेळाडू त्याला कोण वाटतो? त्यावर उत्तर देताना सचिनने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचे नाव घेतले होते. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा हे दोन्ही खेळाडू अगदी नवखे होते. पण सचिनचा अंदाज खरा ठरवत दोन्ही खेळाडू एका मागोमाग एक विक्रम करत आहेत.
विक्रम करण्यासाठी कुठल्या स्पर्धेचे त्यांना ओझे नसते. रोहित शर्माने हे आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू झाल्याबरोबर सिद्ध केले आहे. रोहित शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना जिंकत मुंबई पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचली आहे. त्याच बरोबर रोहितने स्वतःच्या नावावर अजून दोन विक्रम केले आहेत.






