व्हिडिओ: वोटसन-वेस यांचा IPL सामन्यातील अप्रतीम कॅच!

व्हिडिओ: वोटसन-वेस यांचा IPL सामन्यातील अप्रतीम कॅच!

रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या आय पी एल सामन्यात आजवरच्या सर्वोत्तम रिले कॅचेसपैकी एक पाहायला मिळाली.

दिल्लीचा बॅट्समन श्रेयस अय्यर याने मारलेला एक फटका हवेत उंच उडाला. शेन वॉटसनने मिड ऑन ते लॉंग ऑन पळत बॉलचा पाठलाग केला. त्याने  व्यवस्थित कॅच पकडला पण धावण्याच्या गतीमुळे आपण सीमारेषा ओलांडू असे त्याच्या ध्यानात आले. त्यावेळेस त्याने समयसूचकता दाखवून बॉल परत मैदानात फेकला, पण त्याच वेळेस मागे असलेल्या डेव्हिड वेसने डाईव्ह मारून झेल पकडला.  या कॅचचा न चुकवण्यालायक व्हिडिओ खाली पहा.

 

VIDEO: The Shane Watson- David Wiese relay catch...the sensational catch that everyone has been talking about. This...

Posted by IPL - Indian Premier League on Sunday, April 17, 2016


या कॅचसारख्या प्रयत्नांनातरही आर सी बी ला 7 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स:

IPLrelay catchshane watsonrcbdd

संबंधित लेख