एक संपूर्ण पिढीला भुरळ घालणाऱ्या हॅरी पॉटरच्या लेखिका जोअॅन कॅथलीन रोलिंग उर्फ जे. के. रोलिंग यांचा आज वाढदिवस. जवळजवळ २३ वर्षांपूर्वी त्यांनी हॅरी पॉटर सिरीजमधलं पाहिलं पुस्तक लिहिलं होतं. तिथून पुढे एका अनोख्या जादुई सफरीला सुरुवात झाली. नुकतंच फँटँस्टिक बीस्ट सिरीजच्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.
मंडळी, हॅरी पॉटरला तर आपण सगळेच ओळखत असतो. पण त्याला जन्म देणाऱ्या लेखिकेबद्दल आपल्याकडे फारच थोडी माहिती असते. जे. के. रोलिंग यांच्या पुस्तकांप्रमाणेच त्यांचं आयुष्य देखील अद्भुत आहे. चला तर त्यांच्याविषयी माहित नसलेल्या १२ अद्भुत गोष्टी जाणून घेऊ.


















