ही आहेत पुण्यात राहण्याची सर्वात वाईट ठिकाणे !!

ही आहेत पुण्यात राहण्याची सर्वात वाईट ठिकाणे !!

मंडळी पुण्यात घर घेताय किंवा भाड्याने राहायला जाताय? थांबा!! पुण्यातली ही दोन ठिकाणं सोडून कुठेही घर घ्या भौ!! या दोन भागांची नावे आहेत हडपसर आणि लोहगाव. हे दोन्ही भाग म्हणजे राहण्यासाठी सर्वात अयोग्य आहेत. नाही, असं आम्ही म्हणत नाहीये बरं का, नाही तर पुणेकर चिडतील. असं खुद्द पुणे महानगरपालिका म्हणत आहे.

पण राव, हे भाग एवढे वाईट का आहेत ? चला समजून घेऊया.

स्रोत

हडपसर आणि लोहगावात वायू प्रदूषण वाढलंय. हडपसर भाग हा आधीपासूनच सर्वात प्रदूषित भाग म्हणून ओळखला जातो. या भागातल्या हवेत नायट्रोजन प्रमाणाबाहेर आहे, तर लोहगाव भागात नायट्रोजन ऑक्साईड प्रचंड प्रमाणात आहे. त्यासोबतच हडपसरमध्ये हवेतल्या सल्फरची मर्यादा सुद्धा वाढलेली आढळून आली आहे. ही सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने त्यांच्या वार्षिक अहवालात सदर केली आहे.
सततचा ट्राफिक जाम आणि आजूबाजूला चालू असलेलं इमारतींचं काम यामुळे हवेत प्रदूषण पसरत जात आहे. यात दुसरा क्रमांक लागतो शिवाजीनगरचा आणि मंडईचा. हे वैज्ञानिक अहवाल आहेत असं जरी मानलं,  तरी तिथल्या लोकांच्या आरोग्यावरून या अहवालांना पुष्टी मिळते.

राव, या भागातील लोकांना दमा, खोकला, घश्याचे आजार तसेच डोळ्यांना त्रास होणे अशा आजारांना सामोरं जावं लागतंय. हे सर्व होतंय प्रदूषित हवेमुळे.

तर, या सर्व कारणांमुळे हडपसर, लोहगाव भागात राहणे टाळाच..

टॅग्स:

Bobhatamarathi newsmarathi infotainment

संबंधित लेख