बॉलिवूडमध्ये यंदाचे वर्ष गाजवणार हे 5 दमदार बायोपिक्स

लिस्टिकल
बॉलिवूडमध्ये यंदाचे वर्ष गाजवणार हे 5 दमदार बायोपिक्स

सध्या बी - टाऊन मध्ये बायोपिक्सची बरीच चलती आहे. एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडणारे हे चित्रपट प्रेक्षकांनाही आवडताना दिसत आहेत. भाग मिल्खा भाग, मांझी, निरजा, अझहर अशा चित्रपटांची आतापर्यंत बरीच चर्चा झाली. 
इथे आम्ही माहिती दिली आहे 2016 मध्ये रिलीज होणाऱ्या 5 चित्रपटांची जे खऱ्या जीवनावर आधारित आहेत..

सरबजीत

नकळत पाकिस्तानी सीमेत प्रवेश केल्याबद्दल पंजाबमधील एका छोट्या गावात राहणाऱ्या सरबजीत सिंह या सामान्य शेतकऱ्याला 1990 मध्ये झालेल्या पाकिस्तान स्फोटाचा सुत्रधार आणि भारतीय हेर समजून त्याचा अमानुष छळ करण्यात आला. आणि शेवटी तुरुंगातच त्याची हत्या झाली. सरबजीतचा जीवनप्रवास आणि त्याच्या बहिणीने त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी केलेला 23 वर्षांचा संघर्ष दाखवणारा 'सरबजीत' हा चित्रपट 20 मे ला रिलीज होतोय. रणदीप हुडा, ऐश्वर्या राय, रिचा चढ्ढा अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. 

वीरप्पन

कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांच्या सीमेवर आपली दहशत माजवणाऱ्या चंदन तस्कर विरप्पनच्या जीवनावर आधारित राम गोपाल वर्मांचा 'वीरप्पन' हा चित्रपट येतोय येत्या 27 मे ला. हस्तीदंत, चंदन तस्करी करणाऱ्या वीरप्पनने जवळजवळ 184 लोकांचा खून केला होता ज्यात अर्ध्यापेक्षा जास्त पोलिस अधिकार्‍यांचा समावेश होता. भारतीय सीमा सुरक्षा दल, तामिळनाडू पोलिस, विशेष कृती दल यांच्या 'अॉपरेशन कोकून' मध्ये वीरप्पन आणि त्याचे साथीदार मारले गेले. 

रमण राघव 2.0

1960 च्या दशकात मुंबईमध्ये सिरीयल किलींगचा हैदोस घालणाऱ्या रमण राघव या व्यक्तीच्या जीवनावर आधारित 'रमण राघव 2.0' हा चित्रपट रिलीज होतोय 24 जून 2016 रोजी. 20 पेक्षा अधिक लोकांचा खून, बलात्कार, दरोडा असे अनेक गुन्हे करणाऱ्या या व्यक्तीला सायको रमण म्हणून ओळखलं जात होत. हा चित्रपट कान्स महोत्सवात झळकला असून रमणची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली आहे. 

धोनी : दि अनटोल्ड स्टोरी

भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणाऱ्या एम. एस. धोनीच्या जीवनप्रवासावर 'धोनी : दि  अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट रिलीज होतोय येत्या 2 सप्टेंबर ला. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका केली आहे. 

दंगल

दंगल

23 डिसेंबर 2016 रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात आमिर खान याने पहिलवान महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारली आहे. महावीर सिंह फोगट यांनी लोकांचा विरोध झुगारून आपल्या दोन मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले होते. याच मुलींनी पुढे देशासाठी अनेक पदके जिंकली. आमिरने या चित्रपटासाठी बरीच मेहनत केली आहे.

टॅग्स:

dhoni

संबंधित लेख