मंडळी, डिजिटल स्ट्रिमींग प्लॅटफॉर्मच्या गर्दीत एक नवीन एन्ट्री आली आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम सारखे दमदार स्पर्धक असताना टीव्हीच्या प्रेक्षकांमध्ये घट होणे हे स्वाभाविक आहे. हीच धोक्याची घंटा लक्षात घेऊन प्रमुख टीव्ही चॅनेल्स डिजिटल प्लॅटफॉर्मवर पण उतरल्या. यात स्टार, झी, सोनी हे प्रमुख चॅनेल्स आहेत तर अल्ट बालाजी सारखं प्रोडक्शन हाऊस पण आहे.
मंडळी, आता या यादीत आणखी एक चॅनेल येत आहे. हे चॅनेल म्हणजे दूरदर्शन.

दूरदर्शन ज्या पद्धतीने अनेक वर्ष मागे पडलेलं आहे ते पाहता दूरदर्शन कधी व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्मवर येईल असं वाटलं नव्हतं. पण आपल्याला एक चांगलाच धक्का देण्यात आला आहे.
देख भाई देख, हम लोग, मालगुडी डेज, फौजी, रामायण, भारत एक खोज पासून ते नव्वदीतल्या मुलांचा आवडता शक्तिमान अशा अनेक कार्यक्रमांनी दूरदर्शन त्याकाळी प्रसिद्ध झालं होतं. आज दूरदर्शनकडे अशा जुन्या मालिकांचा/कार्यक्रमांचा मोठा साठा आहे. व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्मवर हा सगळा साठ रिकामा करण्यात येणार आहे. हे जर शक्य झालं तर आपल्याला त्याच जुन्या मालिका पुन्हा एकदा पाहता येतील राव.

चला तर मंडळी आता तुम्ही सांगा तुम्हाला दूरदर्शनवरच्या कोणकोणत्या जुन्या मालिका पुन्हा पाहायला आवडतील !!




