लॉकडाऊन मध्ये लोकांचा सर्वात मोठा सहारा जर काय ठरले असेल तर ते म्हणजे वेबसिरिज. कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणावर वेबसिरिज बघितल्या गेल्या. त्याआधी देखील वेबसिरिजचे मार्केट लहान नव्हते. आता तर ते अधिकच मोठे होत आहे. सध्याच्या घडीला या बाजारातील सर्वात मोठा खेळाडू म्हणजे नेटफ्लिक्स!!
नेटफ्लिक्सने दर्जेदार सिरीज आणून आपला दबदबा राखला आहे. म्हणूनच नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत आहे. तर असे हे नेटफ्लिक्स ४८ तासांसाठी फुकटात उपलब्ध असणार आहे. या आठवड्याचा विकेंड हा फ्री नेटफ्लिक्सचा असणार आहे.





