आज बोभाटाच्या बागेत फिरताना गीतकार पी. सावळाराम यांनी लिहिलेले आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले 'असावे घर ते अपुले छान' हे जुने गाणे आम्हाला आठवले.
पुढे असावा बागबगीचा।
वेल मंडपी जाई-जुईचा||
आम्रतरूवर मधुमासाचा।
फुलावा मोहर पानोपान||
अशी बाग सर्वांनाच हवीहवीशी वाटते पण शहरीकरणाच्या सपाट्यात आता बागा हरवल्याच आहेत. घरात ठेवण्याची झाडं म्हणजे 'इन डोअर प्लँट' ही फक्त फॅशन झाली आहे. शहरांची निर्मिती करताना बर्याच टाऊन प्लॅनींगच्या नकाशात 'गार्डन प्लॉट' राखीव ठेवले जातात, पण त्यावर बागा फुलतच नाहीत. काही दिवसांनी त्यावर अनधिकृत घरं तयार होतात आणि बागेचा विषय संपतो. असं घडत असताना काही निसर्गप्रेमी त्यातूनही मार्ग काढतात आणि त्यातून 'थीम गार्डन' जन्माला येते. अशा काही थीम गार्डनच्या रचनेबद्दल आज आपण जाणून घेऊ या.











