एकाच चित्रात लपली आहेत टीव्ही मालिकांमधली ५८ पात्रं...तुम्हाला किती ओळखता येतायत पाहा !!

लिस्टिकल
एकाच चित्रात लपली आहेत टीव्ही मालिकांमधली ५८ पात्रं...तुम्हाला किती ओळखता येतायत पाहा !!

आजच्या टीव्ही मालिकांची परिस्थिती चावून चोथा झालेल्या ऊसासारखी झाली आहे. पण दहावर्षापलीकडे अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळच्या मालिकांना विषय आणि आशय दोन्ही होते. आजही आपल्याला टीव्ही मालिका म्हटलं की जुन्या मालिका आठवल्याशिवाय राहत नाही. 

आम्हाला विश्वास आहे कि तुम्हालाही जुन्या मालिका नक्कीच आठवत असतील. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास चॅलेंज घेऊन आलोय. BBDO या जाहिरात कंपनीने गेल्यावर्षी एक चित्र तयार केलेलं. या चित्रात भारतातल्या ४५ जाहिरातींचा कोलाज होता. यावर्षी BBDO ने Kyoorius awards आणि ZeeMELT  सोबत मिळून असंच एक चित्र तयार केलं आहे. चित्राचा विषय आहे भारतीय टीव्ही मालिका.

या एका चित्रात आजवरच्या गाजलेल्या मालिकांमधली तब्बल ५८ पात्रं दिसतायत. यात जुन्या आणि नव्या दोन्ही मालिकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, या चित्रात जेठालालही आहे आणि हम पांच मधले आपले लाडके अशोक सराफही आहेत. ते कुठे दिसतायत हे मात्र आम्ही नाही सांगणार. हेच तर खरं चॅलेंज आहे. 

चला तर लागा कामाला, यातली किती पात्रं तुम्हाला ओळखता येतायत ते पाहा. ओळखलेल्या पात्रांची यादी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा.  

टॅग्स:

Bobhatabobhata marathimarathi news

संबंधित लेख