नशा करणाऱ्यां किती चित्रविचित्र गोष्टी करतात हे सांगण्याची गरज नाही. अधूनमधून त्यांचे व्हिडिओ वायरल होत असतात. पण एका गड्यासोबत जास्तच विचित्र गोष्ट घडली आहे राव!!
स्कॉटलँडमधला बार्नी रुल नावाचा २० वर्षाचा तरुण एडिनबर्ग युनिव्हर्सिटीत शिकतो. भावाने युनिव्हर्सिटी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच खुशीत मित्रांसोबत पार्टी करायला गेला. जवळच असलेल्या एका क्लबमध्ये तो आणि त्याचे मित्र पार्टी करत होते. त्याला जशी चढायला लागली तसा तो क्लबमधून निघून गेला.






