हे रेकॉर्डिंग करण्यासाठी एलिझाबेथच्या गर्भाशयावर लावण्यात आलेले इलेक्ट्रोड्सच्या सहाय्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्प्लसेस मोजण्यात आले आणि एमआयडीआय तंत्राच्या सहाय्याने हे इम्प्ल्सेस सिंथेसायझरवर टाकण्यात आले. सगळा खेळ खरे तर तंत्रज्ञानाचा आहे. एलिझाबेथने यापूर्वी याच तंत्राचा वापर करून प्राणी आणि झाडांतील संगीत सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिने गर्भाचे संगीत ऐकण्याच्या आणि इतरांनाही ऐकवण्याचा एक अनोखा प्रयोग केला आहे.
गर्भाचे संगीत या शब्दातच कितीतरी आनंदाचे तरंग लपल्याचा भास होतो. ल्युकाचे हे संगीत म्हणजे मानवी संगीत नाही तर हे अशा जीवाचे संगीत आहे जे अजून पूर्णत्वास पोहोचले नव्हते. मन, तर्क-वितर्क, प्रभाव आणि मानवी संवेदना या सगळ्यांच्याही अलीकडचे हे संगीत आहे. म्हणूनच याला एलिझाबेथने अजन्मेय म्हटले आहे. या अल्बम मधील अनेक ध्वनींची पुनरावृत्ती टाळली आहे. विशेष म्हणजे तिचा तो गर्भित आवाज स्पष्ट एकता यावाआणि तो इतर ध्वनित मिसळून जाऊ नये म्हणून त्यांनी याला इतर संगीत जोडलेले नाही. हा आवाज विकसित होत जाताना आपल्याला जाणवतो.