मंडळी, कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावलीय. कामानिमित्त बाहेर निघणार असाल तर या पावसाचा वैताग येईल. पण जर तुम्ही घरी असाल तर एक कप वाफाळता चहा, गरमा गरम भजी आणि बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस यापेक्षा सुंदर काहीच नाही.
मंडळी, पावसाळ्यात जसं चहा आणि भजीचं एक अतूट नातं असतं, तसंच आणखी एक गोष्ट आहे जी पावसाळ्यात बहार आणते. ती गोष्ट म्हणजे ‘गाणी’. आपल्या फिल्म इंडस्ट्रीने ‘पाऊस’ या विषयावर आपल्याला अनेक गाणी दिली आहेत. पाऊस हा विषयच असा आहे की त्याने अनेक पिढ्यांना भुरळ घातलीय. म्हणूनच तर राज कपूर नर्गिसच्या ‘ प्यार हुआ इक़रार हुआ’ पासून ते ‘आशिकी २’ मधल्या ‘तुम ही हो’ पर्यंतच्या पिढीला या गाण्यांनी वेड लावलंय.
मंडळी, आजच्या मुसळधार पावसाच्या निमित्ताने पाहूयात ३ पिढ्यांना वेड लावणारी अफलातून अशी ही ‘पावसाची गाणी’...




