आधुनिक गझल गायकीचा जादुगार ज्याने गझल हा प्रकार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवला त्या दिग्गजाचा आज जन्मदिन. जगजीत सिंह हे गझल प्रकाराला एक वेगळं वळण देणारे ठरले. सहसा नवाब आणि शायरीच्या जाणकार लोकांमध्ये बंदिस्त असलेला गझल प्रकार त्यांनी पहिल्यांदा तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवला.
जगजीतजींनी गायलेलं “होश वालों को ख़बर क्या बेख़ुदी क्या चीज़ है” या गाण्याने तरुणाईला वेड लावलं. “होठों से छूं लो तुम मेरा गीत अमर कर दो” म्हणताना त्यांनी प्रत्येकाच्याच काळजात हात घातला. त्यांनी गायलेली प्रत्येक गझल आपल्या मनावर वेगळा ठसा उमटवते. त्यांच्या नावाप्रमाणे ते जग-जीत होते यात शंका नाही.
आज याच गझल बादशाहाच्या आठवणीत ऐकुया त्यांच्या काही अप्रतिम गझला !!




