तर, जसलीन गेल्या १० वर्षापासून हिंदी, इंग्रजी, पंजाबी आणि इतर भाषांमधून आपला आवाज देत आहे. तिचा आवाज तुम्ही पहिल्यांदा नक्कीच ऐकत नसणार, हे आम्ही पैजेवर सांगू शकतो. पूर्वी डोकोमोची जी जाहिरात यायची, तिच्या मागचा आवाज जसलीनचा होता. Interactive voice response म्हणजे IVR साठी जसलीनने आवाज दिला आहे. उदाहरणच द्यायचं तर हेल्पलाईनवर कॉल केल्यावर अमुक पर्याय निवडण्यासाठी तमुक क्रमांक दाबा सांगणारा यांत्रिकी आवाज देखील जसलीनचा असतो. टेलिकॉम, हॉस्पिटल, एअरलाईन्ससाठी लागणारे असे अनेक IVR तिने केले आहेत. एवढंच नाही तर पुस्तकं ऑडीओ रुपात सादर करणाऱ्या अमेझॉनच्या ऑडीबलसाठी जसलीनने काम केलंय. तिच्या आवाजातील ३ पुस्तकं ऑडीबलवर ऐकायला मिळतात.
सध्याच्या कोरोनाच्या सूचनेमुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. आता या पुढे जेव्हा केव्हा तो यांत्रिकी आवाज ऐकाल तेव्हा जसलीनची आठवण नक्कीच येईल.
जाता जाता आपल्या मराठमोळ्या वॉईस ओव्हर आर्टिस्ट 'मेघना एरंडे'च्या आवाजाची जादू पाहूया.