सेलेब्रिटी, खासकरुन सिनेमात करणाऱ्या लोकांना चेहऱ्यावर वाढतं वय दिसून चालत नाही. मेकअपने वार्धक्याच्या काही खुणा लपवता येतात, पण तरीही ते वय इकडून तिकडून डोकावत राहातं. त्यात आपल्या सौंदर्याच्या कल्पना आणि नैसर्गिक सौंदर्य यात तफावत असेल तर प्लास्टिक सर्जरी असे काहीबाही उपाय करुन सेलेब्रिटीज नेहमी वय आणि सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करतात. मग काय, ग्रेसफुली एजिंग वगैरे तर्क बाजूला पडतो आणि सिनेस्टार आणि काही लोक थेरपी आणि ट्रीटमेंट वापरुन तरुण दिसायचा प्रयत्न करतात.
ते नक्की काय करतात हे जाणून घ्यायचंय? वाचा तर मग. अर्थात हे आहेत काही उपाय. पैसे घालवून वाट्टेल ते करणाऱ्या पब्लिकसाठी कितीही केलं तरी कमीच आहे. हो ना?












