दोनच दिवसांपूर्वी रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीने कोरोनील आणि श्वासारी ही कोवीडवर रामबाण औषधे असल्याचा दावा केला तेव्हा त्यावर अनेक चर्चा झाल्या. काही चर्चा केवळ आश्चर्य, थट्टा, हेटाळणी या स्वरुपाच्या होत्या, तर काही आक्षेप अत्यंत गंभीर होते. परिणामतः आयुर्वेदात नियमित वापरल्या जाणार्या तीन वनस्पतींच्या मिश्रणाला थेट कोवीड निवारणाचा रामबाण उपाय जाहीर करणार्या रामदेवबाबांच्या फार्मसीला सणसणीत तंबी देण्यात आली. सोबत या औषधाची जाहिरात अशा पध्दतीने करू नये अशा सूचनाही देण्यात आल्या.
आता आपण कोरोनील आणि श्वासारी यांची अधिक चर्चा वाचण्यापूर्वी पुष्टी आणि आक्षेप या दोन्ही मुद्द्यांचा वेगवेगळ्या पातळीवर विचार करायला हवा.










