उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राण्यांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. त्यातलाच एक बदल होता चयापचय क्रियेचा. हा बदल परिस्थितीनुसार होत गेल्याचं दिसून येतं. उदाहरणार्थ, हिमवर्षाव सरू झाल्यानंतर अस्वल हायबरनेट म्हणजे सुप्तावस्थेत जातात. या काळात त्यांची हालचाल संथ होते आणि ते जवळजवळ ३ महिने अन्नाशिवाय जगू शकतात. हिमवर्षावात अन्न मिळत नसल्यामुळे वर्षानुवर्षांच्या उत्क्रांतीतून अस्वलाच्या शरीरात बदल होत गेले आहेत. त्याचाच हा परिणाम आहे.
अशा प्रकारे पचनक्रिया संथ करण्याची आणि हालचाल मंदावण्याची क्षमता अनेक प्राण्यांमध्ये आढळते. म्हणून तर या पृथ्वीवर अन्नाशिवाय जास्तीत जास्त ३० वर्षं जगणारे प्राणी अस्तित्वात आहेत. याच्या विरुद्ध बाजूला असेही काही प्राणी आहेत जे २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ अन्नाशिवाय राहू शकत नाहीत. यात माणसाचाही समावेश होतो.
याबद्दल आणखी माहिती शोधली असता आम्हाला असे १३ प्राणी आढळले आहेत जे अन्नाशिवाय जास्तीतजास्त काळ जगू शकतात. चला तर त्या १३ प्राण्यांची ओळख करून घेऊया.

















