आपल्या खाण्या-पिण्यावरून आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. दैनंदिन जीवनात आपण खात असलेले बरेच पदार्थ आपल्यासाठी पोषक असतात, पण अशाच रोजच्या खाण्यातल्या काही पदार्थांमुळे आपलं आरोग्य धोक्यातही येऊ शकतं. हे पांढरे पदार्थ पाहून तुम्ही म्हणाल की हे पदार्थ तर मी रोज खातोय...! असं असेल तर मग वेळीच सावध व्हा!
या पांढऱ्या पदार्थांच्या यादीत समावेश होतो साखर, पांढरे मीठ, पांढरा भात, ब्रेड, मैदा, पास्ता आणि अशा अनेक बेकरी उत्पादनांचा ज्यांच्यात मैदा आणि साखरेचा सर्रास वापर केला जातो. यापैकी बहुतांश पदार्थ हे आपल्या रोजच्या आहारातले अविभाज्य घटक आहेत. पण रिफाइन आणि प्रक्रिया केलेले हे पांढरे पदार्थ आपल्या आरोग्याचा घात करू शकतात.








