सध्या जग ज्या बातमीची रोज आतुरतेने वाट बघते आहे ती बातमी म्हणजे निरनिराळ्या व्हॅक्सीनच्या ट्रायलची! बोभाटाने आधी लिहिलेल्या लेखात या ट्रायल कशा घेतल्या जातात याची सविस्तर माहिती दिलीच होती. ट्रायलच्या बातम्या रोज येत आहेत. जशा खर्या बातम्या येत आहेत तशा खोट्या अपप्रचार करणार्या बातम्या पण माध्यमांतून येत आहेत. ट्रायलमध्ये भाग घेणार्यांकडून थेट आपल्यापर्यंत फारच कमी बातम्या पोहचतात.
दोन दिवसांपूर्वी 'बोभाटा'चे मित्र डॉ. मिलिंद पदकी यांनी एका व्हॅक्सीनच्या ट्रायलमध्ये भाग घेतला होता. या ट्रायलसबंधी अधिक माहिती देण्यापूर्वी डॉ. मिलिंद पदकी यांची ओळख करून घेऊया. डॉ. मिलिंद पदकी गेली अनेक वर्षे अमेरिकेतल्या एका औषध कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. आता ते या विषयावर स्वतंत्र लिखाण करतात. त्यांनी ट्रायलमध्ये सहभाग घेतल्यावर जे अनुभव आले ते आम्ही त्यांच्याच शब्दात देत आहोत. हे वाचल्यावर तुमच्या मनात जे प्रश्न येतील ते कमेंटबॉक्स मधून विचारा. डॉ. मिलिंद पदकी त्या प्रश्नांची उत्तरे देतील.








