पॅरिस सिंड्रोम माहित आहे का तुम्हाला? माहित नसेल तर आम्ही सांगतो. पॅरिस बघायला जाणाऱ्या लोकांनी आपल्या मनात पॅरिसच्या देखणेपणाबद्दल एक चित्र तयार केलेलं असतं. पण पॅरिसमध्ये पोचल्यावर खरोखरचं पॅरिस आणि त्यांच्या मनातलं पॅरिस दोन्ही वेगवेगळे असतात. अशा घोर निराशेच्यावेळी काही लोकांमध्ये भ्रम होणे, डोकेदुखी, निराशा, उलट्या, अशी लक्षणं दिसून येतात. हे कोणत्याही ठिकाणच्या बाबतीत होऊ शकतं, पण पॅरिसला भेट देणाऱ्या लोकांमध्ये ही विकृती जास्त आढळून आल्याने त्याला पॅरिस सिंड्रोम हे नाव पडलं.
पॅरिस सिंड्रोमचं प्रमाण पूर्वी जास्त होतं, आता ते कमी झालं आहे. कारण अर्थातच इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेले फोटोज.
पॅरिसशिवाय पण अशी काही ठिकाणं आहेत जे तुमची घोर निराशा करू शकतात, त्यामुळे आधीच मनाची तयारी केलेली बरी. ही १० ठिकाणं बघून घ्या !!














