संगीत ही मनामनाला जोडणारी एक सुंदर भाषा आहे. हा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. पण आपल्यापैकी अशीही काही माणसं असतात की गाणं ओळखीचं असुदे वा अनोळखी ते ऐकल्यानंतर त्यांचे अंग शहारून येते. हा अनुभव तसा दुर्मिळ आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतंच असं नाही. काहीजणांना हा अनुभव कधीच येणार नाही असेही होऊ शकते. निसर्ग हा भेदभाव कसा करतो हे शास्त्रज्ञांना पडलेलं कोडं आहे. या कोड्याचा शोध घेता घेता शास्त्रज्ञांना मानवी मनाच्या काही नव्या गमतीजमती कळल्या आहेत.
गाणं तुम्ही ऐकता, आम्हीही ऐकतो मग हे लोक वेगळे कसे ? चला समजून घेऊ.







