आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले आहे की, जो जेवढे जास्त मार्क मिळवतो भविष्यात तो तेवढाच जास्त यशस्वी होतो. दहावीच्या मार्क्सबद्दल तर हे खुप मोठ्या प्रमाणावर बोलले जाते. दहावीचे आपल्याकडे किती महत्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही मंडळी!! दहावीत नापास होऊनही मोठे अधिकारी, उद्योजक झालेले अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. पण गुजरातच्या एका दहावी नापास तरुणाने चक्क विमान बनवले आहे!!
१० नापास झालेल्या या मुलाने ३५ विमान तयार केलेत भाऊ....


मंडळी, बडोद्याचा प्रिन्स पांचाल या दहावी नापास तरुणाने 35 अशी विमाने तयार केली आहेत जी रिमोट कंट्रोलने चालवता येतील. हा गडी दहावीत सगळे सहाच्या सहा विषय नापास झाला होता. त्यानंतर तो रिकामाच असल्याने इंटरनेटवर त्याने हळूहळू विमान बनवण्याचे तंत्र शिकून घेतले.

त्याने त्याचे पहिले मॉडेल हे फ्लेक्स आणि बॅनरसाठी वापरण्यात येणारे सामान वापरून तयार केले मंडळी!! प्रिन्सचे यु ट्यूब चॅनल पण आहे. त्या माध्यमातून तो त्याचे प्रयोग सातत्याने लोकांपुढे मांडत असतो. तो सांगतो की एवढे करूनही आजही लोक त्याला दहावी पास झाला नाही म्हणून नावे ठेवतात. पण लोकांना त्याच्या बद्दल माहित झाल्यावर सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे. लोक त्याला ‘तारे जमीन पर’ वाला मुलगा देखील म्हणत आहेत.

प्रिन्सचे काम बघून अनेकांनी भारताच्या शिक्षणव्यवस्थेवर टीका केली आहे. अनेक लोक शाळा सोडल्यावर मोठे काम करत आहेत. अशा परिस्थितीत मुलांच्या क्षमतेला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेची गरज अनेकांनी बोलून दाखवली.

प्रिन्सच्या उदाहरणाने हे सिद्ध झाले आहे की परीक्षेत मार्क मिळवण्याच्या स्पर्धेत न पडता खऱ्या अर्थाने आपल्या आतील क्षमता ओळखून ती जपण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे असते.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१