वेळ जसजशी पुढे सरकते तसतशा गोष्टी बदलत जातात. सध्याच्या स्मार्टकाळात तर रोजच्या रोज गोष्टी बदलत आहेत. आपल्या घरातल्या आणि घराबाहेरच्या देखील अनेक गोष्टी ज्या आपल्या जगण्याचा भाग होत्या, त्या आपल्या नकळत कधीच कालबाह्य झाल्या आहेत. पण अजूनही कुठेतरी त्या गोष्टी दिसल्या तर आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत. चला तर आज अशाच जुन्या आठवणींना उजाळा देऊया.
आज कालबाह्य ठरलेल्या पण जुन्या काळातल्या महत्त्वाच्या १५ गोष्टी!!


१. ऑडिओ कॅसेट
जेव्हा युट्युब नव्हते, ना गाणी ऐकायला कुठले स्पॉटीफाय होते, अशा वेळी आपल्याला आधार दिला तो ऑडिओ कॅसेट्सने. प्रत्येकाच्या घरात या कॅसेट्स सापडत असत.

२. स्टोव्ह
सध्या वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक स्टोव्ह मार्केटमध्ये आले आहेत. पण एकेकाळी असा देखील स्टोव्ह होता ज्याचा कधी स्फोट होईल याचा काही नेम नसायचा.
भडका उडून स्त्रियांना पेटवणाऱ्या स्टोव्हने भारतात आणखी काय करामती घडवल्या माहित आहेत?

३. बल्ब
वेगवेगळ्या रंगसंगती असणाऱ्या बल्बच्या जमान्यात उजेड कमी आणि बिल जास्त देणाऱ्या बल्बची पण आठवण येत असते.

४. पत्रपेटी
खेडेगाव असो की मोठे शहर अनेक ठिकाणी ठेवलेल्या पत्रपेट्या सध्या दिसत नाहीत. क्वचित दिसल्याच तर गंजून गेलेल्या अवस्थेतल्या दिसतात. या पत्रपेट्यांना बघून जुने दिवस आठवल्याशिवाय राहत नाही.

५. स्विच
या प्रकारचा स्विच हा लहानपणी खेळायला अनेकांना आवडायचा. तसेच हा स्वीच एखादी वस्तू टांगण्यासाठीही उपयोगात येत असे.

६. पुस्तकांचे कव्हर
सध्याच्या ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात पुस्तके कमी दिसतात तिथे कव्हरची काय बात! पण एकेकाळी शाळा सुरू झाल्यावर खाकी रंगाचे कव्हर घालणे हा नियम होता.

७. लँडलाईन
सध्याच्या फ्री कॉलिंगच्या जमान्यात आणि मोबाईल घेऊन हिंडण्याच्या काळात एकाच जागी तासंतास उभे राहून लँडलाईन वरून बोलण्याचा संघर्ष किती मोठा होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

८. कॅमेरा
आजकाल दिवसाला शेकडो सेल्फी काढून देखील समाधान होत नाही, पण पूर्वी या रोलवाल्या कॅमेऱ्याने एखादा फोटो काढला तरी माणूस ढगात उडत असे.

९. अँटेना
केबल आणि डिटूएच पिढीला अँटेना फिरवून फिरवून टीव्ही पाहण्याचा आनंद सांगण्याची गरज आहे.

१०. ऍटलास सायकल
आता मुले वयात आल्याबरोबर स्पोर्ट बाईकचा आग्रह धरतात. पण एकेकाळी ज्या घरात ऍटलास सायकल आली त्या घरात जग जिंकण्याचा आनंद असे.

११. व्हिडिओ गेम
लहान मुलांना खेळण्यासाठी आता गॅजेट्सची कमी नाही. पण एकेकाळी की बोर्डचा व्हिडीओ गेमवर तेच तेच गेम खेळून देखील मुले थकत नसत.
१२. कॉमिक बुक्स
मोबाईल नसलेल्या काळात कॉमिक बुक्सनी पिढ्या घडवल्या होत्या. मराठीतील चंपक आणि ठकठक तुम्हालाही आठवत असतील

१३. शाईचा पेन
हा पेन ज्याच्याकडे असे तो एकदम साहेब समजला जायचा. हात खराब होऊन देखील शाईचा पेन वापरण्याची मजा काही औरच होती.

१३. क्रिकेटर्सचे स्टिकर
सचिन, गांगुली, द्रविड यांचे स्टिकर भिंतीवर आणि वह्यांवर नसतील तर तुम्ही मॉडर्न नाहीच असे समजण्याचा तो काळ होता.

१५. स्वागतम लिहिलेले डोरमॅट
सध्या विविध फॅशनचे डोरमॅट इंदैनाले असले तरी स्वागतम लिहिलेले डोरमॅटची फॅशन वेगळीच होती.
तर या होत्या काही नॉस्टॅलजीक गोष्टी!! तुम्हाला देखील अशा अजून काही गोष्टी आठवत असतील तर आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलबसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१