पूर्वी राजेशाही होती. आज राजेशाहीला जगात स्थान नाही. पण काही नामधारी राजे नक्कीच आहेत. सर्वसामान्यांना परिचित असलेलं राजघराणं म्हणजे इंग्लंडचं राजघराणं. इंग्लंडच्या राणीकडे काही विशेषाधिकार नक्कीच आहेत, पण मुळातच इंग्लंडमध्ये constitutional monarchy म्हणजे संविधानिक राजेशाही आहे. राणीच्या हातातील मोजके अधिकार सोडले तर सर्व निर्णय संसदेकडे असतात. इंग्लंड खेरीज स्वीडन, मोनॅको, डेन्मार्क या देशांतील राजघराणीही याच पद्धत काम करतात. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हे राजे मंडळी नामधारी आहेत.
असं असलं तरी ह्या राजेलोकांच्या रोजच्या आयुष्यातला शाही थाट काही कमी झालेला नाही. प्रचंड पैसा, दिमतीला नोकर, राजवाडा, मानसन्मान इत्यादी हे राजेलोक उपभोगत असतात. आज आम्ही हे सगळं सांगतोय कारण राजघराण्यातील काही मंडळींनी आपलं हे थाटातलं आयुष्य नाकारून सर्वसामान्य लोकांप्रमाणे जगणं पसंद केलं आहे. सर्व सामान्य लोक करतात तशी कामे हे लोक करतात. आजच्या लेखात आपण शाही कुटुंबातील अशाच निवडक व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत !!












