स्कॉटलँड या देशाने अतिशय महत्वाचा असा कायदा पास केला आहे. स्कॉटलँड या देशाने त्यांच्या देशातील सर्व महिलांना मासिक पाळी संबंधी सर्व उत्पादनं मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे २०२० साल उजाडून देखील स्कॉटलँड हा देश असे करणारा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे.
स्कॉटलँड देशाने अधिकृत कायदा करून हा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व वयोगटांतील महिलांना या कायद्यानुसार मोफत सॅनिटरी नॅपकिन आणि इतर उत्पादनांचे वाटप करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी स्कॉटलँडकडून राष्ट्रव्यापी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.






