मुंबई आणि पुणे दोन्ही महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाची शहरे आहेत. एक राज्याची राजधानी तर दुसरी सांस्कृतिक राजधानी. या दोन्ही शहरांत राहणाऱ्या लोकांसाठी स्वतःचे शहर म्हणजे अभिमानाचा विषय. मुंबइकर आणि पुणेकर बऱ्याचवेळा कोणते शहर अधिक भारी यावरून भिडत असतात. आता त्यांना भांडण्यासाठी अजून एक कारण मिळाले आहे.
महाराष्ट्र सरकारने पुणे महानगरपालिका क्षेत्राजवळील २३ गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने पुणे आता भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर ठरले आहे. पुण्याने आता ५१६.१८ चौरस किलोमीटर भुभागासहीत ४४० चौरस किलोमीटरच्या भुभाग असलेल्या मुंबईला मागे टाकले आहे. याचबरोबर पुणे आता भारतातील सातवे सर्वात मोठे शहर सुद्धा असणार आहे.






