मित्रांनो, सध्या कितीही महाग मोबाईल घेतला तरी दीड दोन वर्षात असं वाटायला लागतं की आता मोबाईल बदलला पाहिजे. याची दोन कारणं सांगता येतील.
एक म्हणजे तुम्हाला असे वाटायला लागते की आता तुमचा सेलफोन आउटडेटेड झाला आहे. आजकाल तर अगदी दर पंधरा दिवसांनी मोबाईलचं नवं मॉडेल बाजारात येत असतं. अशावेळी प्रोसेसरची पॉवर कमी असणं, बॅटरी बॅकअप कमी असणं अशा कारणांमुळे मोबाईल बदलावा असं वाटतं किंवा मग मोबाईल सतत हँग किंवा गरम होत असेल तर आपण मोबाईल बदलतो. हल्ली तर मोबाईलचा स्फोट झाल्याची बरीच प्रकरणं घडत आहेत.









