या एकाच कुटुंबात सगळ्यांना आहेत १० पेक्षा अधिक बोटं...वाचा या दुर्मिळ आजाराविषयी !!

लिस्टिकल
या एकाच कुटुंबात सगळ्यांना आहेत १० पेक्षा अधिक बोटं...वाचा या दुर्मिळ आजाराविषयी !!

केरळचं कोदिन्ही हे गाव जुळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्या गावात जवळजवळ प्रत्येक घरात जुळी मुलं आहेत. आज आम्ही अशा एका कुटुंबाची माहिती देणार आहोत जिथे प्रत्येकाला १० पेक्षा जास्त बोटे मिळाली आहेत.

मंडळी, मध्यप्रदेशच्या बैतुल येथील अथनेर भागात राहणारं हे यावले कुटुंब आहे. या कुटुंबात २५ सदस्य आहेत. या सगळ्यांनाच १० पेक्षा जास्त बोटे आहेत. त्यांच्यातल्या या वेगळेपणामुळे हे कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव प्रसिद्ध झालं आहे, पण या प्रसिद्धीचे भयंकर दुष्परिणाम पण आहेत.

या कुटुंबातील बलदेव यावले यांनी सांगितलं, की “माझ्या मुलांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. इतर मुलं त्यांना शाळेत चिडवायची”. अपूर्ण शिक्षण आणि सोबत शरीरात असलेल्या व्यंगामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे. या घरातील तरुणांना कोणीही नोकरी द्यायला तयार नाही.

संतोष नावाचा कुटुंबातील एक सदस्य सैन्यात नोकरी मिळावी म्हणून गेला होता, पण त्याच्या हातांना आणि पायांना प्रमाणाबाहेर बोटे असल्याने त्याची निवड झाली नाही. त्याच्या हातांना १२ बोटे आहेत, तर पायांना १४. सैन्यातील नोकरी तर गेली पण इतर नोकऱ्या पण त्याला मिळत नाहीत.

हा कोणता आजार आहे ?

हा कोणता आजार आहे ?

या आजाराला “पॉलीडॅक्टिली” म्हणतात. डीएनएतील बदलांचा हा परिणाम असतो. हे जन्माच्यावेळीच घडून येतं. यावले कुटुंबाच्या ज्या मूळ पुरुषापासून ही सुरुवात झाली तिथून तो पुढच्या पिढीला वारसा म्हणून मिळत गेला आहे.

बॉलीवूडच्या ह्रितिक रोशनला पण पॉलीडॅक्टिली आजार आहे. त्याला मिळालेल्या अधिकच्या अंगठ्यामुळे मुलं त्याच्यापासून लांब पाळायची, पण तो ठरला स्टार-कीड. त्याला त्याचा फारसा त्रास झाला नाही. यावले कुटुंबाची परिस्थिती मात्र विदारक आहे. प्रशासनाकडून तर त्यांना मदत मिळायलाच हवी, पण आधी लोकांनी त्यांना स्वीकारण्याची गरज आहे.

 

आणखी वाचा :

या जुळ्यांना का व्हायचं नाही एकमेकांपासून वेगळं ??

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख