JEE च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. अमेझॉन इंडिया (Amazon India) हे नाव आता सर्वाना ओळखीचे आहे. पण आता ही फक्त शॉपिंगशी मर्यादित साईट नसून त्यांनी शिक्षणक्षेत्रात एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. याचा फायदा देशभरातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
नुकतंच अमेझॉन इंडियाने अमेझॉन अकॅडमी सुरू केल्याची घोषणा केली आहे. जेईई (JEE) च्या परीक्षेच्या तयारीसाठी मुलांना मदत व्हावी म्हणून अमेझॉन अकॅडमीची सुरुवात केली असल्याचे अॅमेझॉन इंडियाने सांगितलं आहे. या बुधवारीच त्यांनी ही घोषणा केली आहे.







