ॲपलने फोटोग्राफर्ससाठी एक मस्त संधी आणली आहे. ते आपण काढलेले फोटो आपल्या जाहिरातीत आणि होर्डिंग्जवर लावणार आहेत. अर्थातच, ते फोटो इतके चांगले असतील आणि त्यांना आवडले तरच हे होऊ शकेल. यासाठी त्यांनी #ShotOniPhone ही स्पर्धा आयोजित केली आहे. ॲपलने त्यासाठी आयफोन मालकांकडून त्यांनी काढलेले फोटो पुढील दोन आठवड्यात मागितले आहेत. या स्पर्धेचे परीक्षक जगभरातून आलेल्या फोटोंपैकी दहा सर्वोत्तम स्पर्धक निवडणार आहेत.
आयफोनवाल्यांनो, या फोटोस्पर्धेत तुम्ही नक्कीच भाग घ्या....


काय आहे ही स्पर्धा?
या स्पर्धेच्या नावातच सगळं काही आहे. म्हणजे पाहा, तुम्हाला तुमच्या आयफोनने काढलेला फोटो पाठवायचा आहे. हा फोटो अॅपलचे एडिटिंग टूल वापरून एडिट केलेला असू शकतो किंवा सरळ कॅमेऱ्यात काढलेला फोटो थेट तसाच तुम्ही पाठवू शकता. या स्पर्धेत फोटो पाठवायची शेवटची तारीख ही ७फेब्रुवारी २०१९ आहे.

स्पर्धेत भाग कसा घ्याल?
तर, या स्पर्धेत भाग घेण्याचे दोन मार्ग आहेत. फोटो सोशल मीडियावर टाका किंवा ईमेल करा. जर तुमच्याकडे मस्त फोटो असेल तर लगोलग तो ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर टाका. #ShotOniPhone हा hashtag टाकायला विसरू नका हा. त्याचबरोबर तुमच्या फोनचे मॉडेल caption मध्ये टाका. जर तुम्हाला सोशल मीडियावर फोटो टाकायचे नसतील तर तुमचे हाय रिझोल्यूशन फोटो shotoniphone@apple.com वर ईमेल करून टाका
या स्पर्धेचा निकाल २६ फेब्रुवारीला जाहीर होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा फोटो जिंकला तर ॲपल तो फोटो एक वर्ष विनारॉयल्टी वापरू शकतो. याबदल्यात तुम्हाला फक्त प्रसिध्दी मिळेल. तर मंडळी पाठवणार का तुम्ही फोटो या स्पर्धेत? तुमच्या मित्रांना पण कळवा बरं का..
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१