पण मंडळी, हा रस्ता जगातला सर्वात लांब तरंगणारा मार्ग असला तरी त्याला सर्वात सुंदर म्हणता येणार नाही. आम्ही आज ज्या तरंगत्या पुलाबद्दल सांगणार आहोत त्याचा आकार लहान आहे पण तो आपल्या निसर्गसौंदर्याने जगातील सर्वात लांब तरंगत्या पुलाला टक्कर देतोय.
व्हिडीओत दाखवलेला पूल (किंवा walkway) हा चीनच्या हुबेई प्रांतातला आहे. २०१६ साली पूल बांधण्यात आला. या पुलाची लांबी केवळ ५०० मीटर आहे. पूर्वी नदी ओलांडण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नव्हता. आज या पुलामुळे माणसांबरोबरच वाहनंसुद्धा नदी सहज ओलांडू शकत आहेत. नदीचा प्रवाह हा डोंगर कडांमधून मार्ग काढत गेलेला आहे. या नैसर्गिक आकाराने हिरव्यागर्द पहाडांचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. तरंगत्या पुलाचं कौतुक तर आहेच, पण निसर्गानेही या भागाला भरभरून सजवलंय. आपल्याकडे थ्री इडियट्स सिनेमा आल्यावर सगळेजण लेह-लडाखला जायला लागले होते. हा पूल पाह्यल्यावरही तिथं जायलाच हवं असं वाटतं.