मंडळी, चीन मध्ये ‘सेंच्युरी एग’ नावाचा एक विचित्र खाद्यपदार्थाचा प्रकार आहे. बदक, कोंबडी किंवा पक्षांची अंडी अनेक वर्ष एका खास पद्धतीने जपून ठेवली जातात. एका ठराविक वेळेनंतर ती खाल्ली जातात. या काळात अंड्याचा आतला बलक हिरवा झालेला असतो तर बाहेरील पांढरा भाग तपकिरी बनलेला असतो. अशा तऱ्हेच्या अंड्यांना चवीने खाण्याची जुनी परंपरा आहे. मागच्या वर्षी जेव्हा सर्वाधिक घाणेरड्या पदार्थांचं प्रदर्शन भरलं होतं तेव्हा प्रदर्शनात ही अंडी पण ठेवण्यात आली होती.
चीन मध्ये सापडली आहेत २,५०० वर्ष जुनी अंडी....जाणून घ्या ‘सेंच्युरी एग’ बद्दल !!


हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे चीन मध्ये २,५०० वर्ष जुनी अंडी सापडली आहेत. ह्या अंड्यांना ज्या प्रकारे ठेवण्यात आलं आहे त्यावरून आजच्या ‘सेंच्युरी एग’ पद्धतीची आठवण होते. चला तर याबद्दल आणखी जाणून घेऊया !!

सध्या चीनच्या शांगझिंग गावी चीनी राजांची हजार वर्ष जुनी कबर सापडली आहे. उत्खननात या जागी नुकतंच एक मडकं सापडलं. हे मडकं मातीच्या जाड थराखाली दबलेलं होतं. मडकं सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर त्यात २० अंडी आढळून आली. गेल्या हजारो वर्षात अंड्यांच्या आतला भाग नष्ट झाला आहे, पण कवच मात्र सुस्थितीत आहे.

मंडळी, चीनच्या नानजिंग आणि शांगझिंग भागात अशा प्रकारच्या शाही कबरी सापडल्या आहेत. कबरीत तब्बल ६ स्तर आहेत. उत्खननातून हजारो वर्ष जुन्या गोष्टी बाहेर निघाल्या आहेत. नुकतीच सापडलेली अंडी त्यापैकीच एक. त्यापूर्वी सप्टेंबर २०१८ ला याच भागात तब्बल २००० वर्ष जुनी वाईन पण सापडली होती.

(२००० वर्ष जुनी वाईन)
मंडळी, गेल्या काही वर्षात भारतातलं राखीगढी हे ठिकाण भारतातलं सर्वात मोठं उत्खनन क्षेत्र बनलं आहे. असं म्हणतात की हडप्पा आणि मोहंजोदाडो पेक्षाही हे क्षेत्र मोठं आहे. गेल्यावर्षी त्या ठिकाणी एका जोडप्याचे सांगाडे सापडले होते. त्यांना दफन करताना त्यांच्या शरीराची केलेली विशिष्ट रचना त्याकाळातल्या संस्कृतीबद्दल नवीन माहिती देत होते. पण त्याबद्दल सविस्तर पुन्हा कधी तरी बोलू.
तत्पूर्वी हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा !!!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१