मंडळी, मोटारबाईक स्पर्धा प्रचंड वेगासाठी आणि स्पर्धकांच्या हुशारीसाठी ओळखली जाते. हुशारी यासाठी की स्पर्धकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चकवून फिनिश लाईन गाठायची असते. या प्रयत्नात अपघात पण टाळायचे असतात. स्पर्धकांची ही चढाओढ प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरते. पण समजा मोटारबाईक स्पर्धेच्या मध्येच दोन स्पर्धकांमध्ये मारामारी सुरु झाली तर ? मग तर एक्स्ट्रा मनोरंजन मिळतं ना भाऊ. हा पाहा व्हिडीओ !!
व्हिडीओ ऑफ दि डे : मोटारबाईक स्पर्धेत सुरु झाली हाणामारी....पुढे काय झालं ?

राव, कोस्टारिका मोटारबाईक स्पर्धेतला हा विचित्र प्रसंग आहे. स्पर्धेत एका लहानशा अपघातात एका बाईकस्वराचा ताबा सुटून तो दुसऱ्या बाईकवर जाऊन आदळला. त्याची बाईक तोवर भलतीकडेच निघून गेली होती. दुसऱ्याने जेव्हा बाईक थांबवली तेव्हा पहिल्या स्पर्धकाने सगळा राग त्याच्यावर काढला. हे बघून दुसरा तरी कसा शांत बसेल, मग त्याने पण पलटवार केला.

मंडळी, Jorge Martinez आणि Marion Calvo अशी त्या दोन स्पर्धकांची नावं आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. त्यांचं नाव लोकप्रिय पण होतंय.
आता झालंय असं की आंतरराष्ट्रीय मोटरसायकल फेडरेशनला हे एक्स्ट्रा मनोरंजन आवडलेलं नाही. दोघांना या प्रसंगाचा मोठा भुर्दंड भरावा लागला आहे. त्यांच्यावर २ वर्षांसाठी बंदी आणली आहे. आता मोटारबाईक रेसिंग स्पर्धेत बॉक्सिंग सुरु केल्यावर आणखी काय होणार आहे भाऊ !!!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१