एकेकाळी भारतात दोनच गाड्या रस्त्यावर धावायच्या, अम्बॅसिडर किंवा फियाट ! घरी गाडी असणं हे श्रीमंतीचं लक्षण समजलं जायचं. ऐंशीच्या दशकाच्या नंतर मारुती 800 चे आगमन झालं, बॅंका गाडी घ्यायला कर्ज द्यायला लागल्या आणि घरोघरी गाडी पोहचली. भारतीय सश्रद्ध मनाने आपल्या गाडीत सर्व प्रथम स्थापना केली विघ्नहर्त्या गणेशाची !
भगवान रामपुरे सांगत आहेत कारच्या डेकवर विराजमान झालेल्या बाप्पाची जन्मकहाणी !!


(भगवान रामपुरे यांनी तयार केलेली बाप्पाची मूर्ती)
कारच्या डेकवर गणपती बाप्पा विराजमान झाले पण ही कल्पना कोणाची हे मात्र फारच थोडक्यांना माहिती असेल. चला तर मंडळी आज आम्ही तुमची ओळख करून देत आहोत ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांच्याशी !

(ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे)
हेच ते शिल्पकार ज्यांच्या हातून 1993 निर्मिती झाली त्या गणेश मूर्तीची जी आजही तुमच्या आमच्या गाडीत विराजमान आहे. गुगलवर फक्त रामपुरे हे टाइप करा आणि गुगल ताबडतोब Rampure Ganesh ही सजेशन समोर देतं इतकं घट्ट नातं आहे भगवान रामपुरे आणि बाप्पाचं !

तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या प्रवेश द्वारातला तो 'बुल' आठवतो का ती निर्मिती पण आहे याच कलाकाराची! पण मंडळी ही गणेशाच्या निर्मितीची कहाणी आज आपण ऐकू या प्रत्यक्ष श्री भगवान रामपुरे यांच्याकडूनच! 'बोभाटा'ने केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा एक्सकलुसिव्ह व्हिडीओ तयार केला याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१