भारतात परीक्षेत कॉपी करणे ही गोष्ट नविन नाही. परीक्षा असली म्हणजे वर्षभर अभ्यास न करणारे गडी भयानक डोक्यालिटी लावून कॉप्या करतात. कोण कुठून कशी कॉपी करेल काहीच सांगता येत नाही. त्यात आपले मुन्नाभाईसारखे सिनेमे आणखी आयडिया पुरवतात. आजवर भारतात कॉप्या बंद करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. आपण शाळेत असताना सांगितले जायचे पुढच्या वर्षीपासून कॉपी करणं पूर्ण बंद होईल, पण तसं काही झालेलं नाही. आणि काही शाळांमध्ये तर शिक्षकच मुलांना कॉप्या पुरवतात.
पण मंडळी, ही समस्या फक्त भारतात आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. हा प्रॉब्लेम पूर्ण जगभर कमी अधिक प्रमाणात आहे राव!! मेक्सिकोत पण मुलांनी कॉपी करणे ही मोठी समस्या आहे, पण तिथे तिथल्या शिक्षकांनी कॉपी रोखण्यासाठी भन्नाट उपाय शोधून काढला आहे.






