जुनी घरे, बगीचे किंवा इतर ठिकाणी तुम्ही कोळ्यांची जाळी बघितली असेल. यात विशेष असे काहीही नाही, ही गोष्ट नेहमीची आहे. पण सध्या ऑस्ट्रेलिया या कोळ्यांमुळे त्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतातील गिप्सलँड या भागात सगळीकडे कोळ्यांची जाळी तयार झाली आहेत. आता सिनेमातील स्पायडरची जाळी वेगळी पण इथे तर खरोखरच्या स्पायडर्सनी लोकांच्या नाकी नऊ आणले आहेत.
गिप्सलँड भागात लाखोंच्या संख्येत कोळ्यांनी जाळी पसरली आहेत. चारी बाजूला हलक्या पांढऱ्या रंगाची चादर अंथरल्यासारखे चित्र दिसत आहे. झाड, मैदान, रस्ते अशा सर्व ठिकाणी ही जाळी दिसत आहेत.
पण एवढ्या मोठ्याप्रमाणात कोळ्यांची जाळी कसे पसरले, काय आहे कारण?






